सर्वोदय-तीर्थ

सर्वोदय स्वाध्याय समितीचे मुखपत्र

आमच्याबद्दल

सर्वोदय-तीर्थ सर्वोदय-तीर्थ म्हणजे सर्व जीवांच्या कल्याणाचा - उत्कर्षाचा प्रशस्त मार्ग.

हा मार्ग तीर्थंकर भ. महावीरांनी मोक्षाला जाण्यापूर्वी सुमारे ३० वर्षे आपल्या दिव्य ध्वनीद्वारे भारतभर विहार करून सांगितला. त्यास आता २५४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या निर्वाणानंतर सुमारे ७०० वर्षे मौखिक रूपाने व पुढे लिपिबद्ध करून तो उपदेश आजपर्यंत गुरुपरंपरेने चालू आहे.

तीर्थंकर भगवान महावीरांच्या २६०० व्या जन्मवर्षांमध्ये जगभर विविध उपक्रमांनी त्यांच्या कार्याचा प्रचार करण्यात आला त्याचवर्षी म्हणजेच मे २००१ रोजी या सर्वोदय पाक्षिकाचा जन्म झाला म्हणजे हे पाक्षिक सुरु झाले. यामध्ये अन्य लौकिक कोणत्याही वार्ता देण्यात येत नाहीत. केवळ भ. महावीरांचा उपदेश की जो त्यांच्या शिष्यांनी - आचार्यांनी प्रवाहित केला तोच मराठी भाषिकांना सोप्या व त्यांच्याच भाषेत उपलब्ध करून देण्यात येतो. अंकात कोणतीही जाहिरात इ. दिली जात नाही.

आमचे अंक

चालू अंक

हे अंक गेली २१ वर्षे न चुकता प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेस व २० तारखेस प्रकाशित होतो.

आमचे अंक